अबब !  २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल ''इतक्या'' हजार रुपयांनी झाली वाढ
अबब ! २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल ''इतक्या'' हजार रुपयांनी झाली वाढ
img
Nandini khandare More
मागील आठवड्यापासून अमेरिका आणि इराणमधील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीची तीव्रता कमी झाली आहे. परिणामी, डॉलर इंडेक्समध्ये मोठी घसरण झाली असून, त्यामुळे सोने आणि चांदीच्या दराला पुन्हा एकदा मोठी तेजी मिळाली आहे.  २४ तासांतील वाढ आणि सद्यस्थितीतील दर गेल्या २४ तासांत स्थानिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ,  सोने, सोन्याच्या दरात २४ तासांत तब्बल ४,५०० रुपयांची वाढ झाली आहे. काल १५१,५०० रुपयांवर असलेले सोन्याचे दर आज थेट १५६,००० (१ लाख ५६ हजार) रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरातही ११,००० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. काल २३०,००० रुपयांवर असलेले चांदीचे दर आज २४१,००० (२ लाख ४१ हजार) रुपयांवर पोहोचले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group