गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठे चढ - उतार पहायला मिळत आहे. लग्नसराईत पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले आहेत. आज सोनं पुन्हा एकदा महागलं असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. सोन्याचे दर आज प्रति तोळ्यामागे १,१०० रुपयांनी वाढले आहेत.
आज २४ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे १,१०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,३५,२८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ८८० रुपयांनी वाढले असून हे दर १,०८,२२४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ११,००० रुपयांची वाढ झाली असून हे दर १३,५२,८०० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १००० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२४,००० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ८०० रुपयांनी वाढले असून ९९,२०० रुपये झाले आहेत. तर १० तोळ्याचे दर १२,४०,००० रुपये झाले आहेत. हे दर १०,००० रुपयांनी वाढले आहेत.
आज १८ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे ८२० रुपयांनी घसरले आहेत. ८ ग्रॅमचे दर ५६५ रुपयांनी वाढले असून ते ८१,१६८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ८२०० रुपयांनी वाढले असून १०,१४,६०० रुपये झाले आहेत.