या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत चढउतार दिसत आहे. सोमवारी, 7 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी उतरले. मंगळवारी भाव जैसे थे होते. 9 ऑक्टोबर रोजी सोने 760 रुपयांनी तर त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी त्यात किंचित घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
29 सप्टेंबरपासून चांदीचा भाव गुडरिटर्न्सवर अपडेट झाला नाही. तर या 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चांदीत 2 हजारांची वाढ झाली. या आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली. सोमवारी भाव जैसे थे होते. 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी घसरली. तर आज सकाळी सुद्धा चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,900 रुपये आहे.
तसेच , आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 74,838, 23 कॅरेट 74,538, 22 कॅरेट सोने 68,552 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,129 रुपये, 14 कॅरेट सोने 43,780 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 88,353 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.