अक्षय्यतृतीयेच्या एख दिवस आधीच सोनं स्वस्त झालं आहे. 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी लोक सोनं किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानतात. यावर्षी 29 एप्रिलच्या संध्याकाळी 5.31 ते 30 एप्रिलच्या दुपारी 2.12 पर्यंत अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार आहे.
सोन्याची खरेदीदेखील याच वेळी केली जाण्याची शक्यता आहे. अक्षय्यतृतीयेला एक दिवस बाकी असतानाच आज 29 एप्रिल रोजी सोनं स्वस्त झालं आहे. आज काय आहेत सोनं-चांदीचे भाव जाणून घ्या.
29 एप्रिल रोजी मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 95,277 रुपयांवर येऊन पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम 89,390 रुपयांवर पोहोचली आहे. तर चांदीची किंमतीत देखील घसरण झाली आहे. आज चांदी 96,245 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
सोनं आणि चांदीच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील घसरण पाहायला मिळतेय. ट्रेड वॉरचे टेन्शन कम होताच सोन्याच्याच्या किंमतीवर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. कॉमेक्सवर सोन्याच्या दरात तब्बल 1 टक्क्यांची घसरण झाली आहे.
त्यामुळं 3325 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. चांदीच्या किंमतीत देखील 33 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. गुंतवणुकदारांची नजर आता अमेरिकेच्या आकड्यांवर आहे. ज्यमुळं फेडरल बँकेच्या व्याजदरात निर्णय घेण्यात येणार आहे.