चांदीच्या दरात मंगळवारी पुन्हा एकदा मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. डॉलरची घसरण, भू-राजकीय तणाव आणि गुंतवणूकदारांचा सरकारी रोखे आणि चलनांमधून कमी होत असलेला विश्वास यामुळे ही तेजी आली आहे. तसंच, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाच्या मालावर टॅरिफ वाढवण्याची धमकी दिल्यानं बाजारावर परिणाम झालाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या किमतीत सुमारे ७% वाढ झाली आहे.
26 जानेवारीच्या तुलनेत आज चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. काल शुद्ध चांदीचा विक्री दर 3,43,400 रुपये प्रति किलो होता, तो आज वाढून 3,65,100 रुपये झाला आहे. म्हणजेच अवघ्या 24 तासांत चांदीच्या दरात 21,700 रुपयांची वाढ झाली आहे. दागिन्यांच्या चांदीचा दरही 3,40,000 रुपयांवरून 3,61,500 रुपये इतका झाला आहे.
सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
24 कॅरेट (Standard): 1,60,300 रुपये (काल 1,60,600 )
22 कॅरेट (916 Hallmarked): 1,49,100 रुपये (काल 1,49,400 )
18 कॅरेट: 1,23,400 रुपये (काल 1,23,700)
14 कॅरेट: 97,000 रुपये (काल 97,200)