दिवाळी संपताच सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
दिवाळी संपताच सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार झाल्याचं पहायला मिळत होते. ऐन दिवाळीत सोन्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. सोन्याचे दर असेच वाढते राहिले तर सर्वसामान्यांनी सोन्याची खरेदी करायची कशी हा प्रश्न होता. पण आता दिवाळी संपताच सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.


आज सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जर आज तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर किती ते जाणून घ्या. 

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,१४० रुपयांनी कमी झाले आहेत. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,२४,४८० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ११,४०० रुपयांनी घट झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,४४,८०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे आज तुम्हाला हे सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

२४ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच घट झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,०५० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१४,१०० रुपये मोजावे लागणार आहे. हे सोनं १,१५,१५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १०,५०० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,४१,००० रुपये खर्च करावे लागतील. हेच सोनं काल ११,५१,५०० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच घट झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८६० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९३,३६० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८,६०० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,३३,६०० रुपये मोजावे लागतील. काल हेच सोनं ९,४२,२०० रुपयांना विकले गेले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group