देशात रोज सोने-चांदीचे भाव बदलत असतात. मागील काही दिवसांत सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ- उतार होताना दिसत आहे. अशातच काल सोने-चांदीच्या किंमतीत घट झाली होती. मात्र, आज सोने चांदीच्या किंमतीत फार बदल झालेला नाही. सोने-चांदीचे भाव स्थिर आहेत.
सोने चांदीचे भाव देशात आज २२ कॅरेट सोने प्रति तोळा ६६,५९० रुपयांनी विकले जात आहे. तर १ ग्रॅम सोन्याची किंमत ६,६५९ रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ६,६५,९०० रुपये आहे. कालच्या तुलनेत फक्त १०० रुपयांनी सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.
२४ कॅरेट सोन्याची किंमत देशात आता २४ कॅरेट सोने प्रति तोळा ७२,६४० रुपयांना विकले जात आहे. तर १ ग्रॅम सोने ७,२६४ रुपयांना विकले जात आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत फक्त १०० रुपयांनी कमी झाली आहे. २४ कॅरेटचं १०० ग्रॅम सोने ७,२६,४०० रुपयांना विकले जात आहे.
चांदीचे भाव
देशभरात चांदीच्या भावात फारसा बदल झालेला नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या किंमती कमी होतील, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. मात्र, आज चांदीच्या किंमतीत फारसा बदल झालेला नाही. देशभरात १ ग्रॅम चांदी ९१.६० रुपयांना विकली जात आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,१७० रुपये आहे. तर १ किलो चांदीची किंमत ९१,६०० रुपयांना विकली जात आहे.