मागील अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता सोन्याच्या भावाला पुन्हा उतरती कळा लागली आहे. आता हे दर पुन्हा कमी व्हायला लागले आहेत. मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली होती. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीही सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.
सोन्याचे दर एका आठवड्यापूर्वी १ लाखांपेक्षा जास्त होते. त्यानंतर हे भाव कमी होत गेले. आज सोन्याचे दर प्रति तोळा ९७,२६० रुपये आहे. हे दर १ लाखांपेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर सोने खरेदी करायचे असेल तर ही उत्तम संधी आहे.
सोन्याचे आजचे दर
२४ कॅरेट सोन्याचे दर
आज सोन्याच्या दरात प्रति तोळा १६० रुपयांनी घट झाली आहे. आज सोन्याचे दर ९७,२६० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात १२८ रुपयांनी घट झाली आहे. आजचे दर ७७,८०८ रुपये झाले आहेत. १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १६०० रुपयांनी घट झाली आहे. १०० ग्रॅम सोन्याचे दर ९,७२,६०० रुपये आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर
आज १ तोळा सोन्याची किंमत ८९,१५० रुपये आहे. या किंमतीत १५० रुपयांनी कपात झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,३२० रुपये आहेत. तर १० तोळा सोन्याच्या दरात १५०० रुपयांनी कपात झाली आहे. हे दर आज ८,९१,५०० रुपये आहेत.
१८ कॅरेट
आज १८ कॅरेट सोन्याचे दर ७२,९४० रुपये आहेत. या दरात १३० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५८,३५२ रुपये आहे. १० तोळा सोन्याच्या दरात १३०० रुपयांनी घट झाली. हे दर ७,२९,४०० रुपये आहेत.
चांदीचे दर
आज चांदीच्या दरातही थोडी घट झाली आहे. ८ ग्रॅम चांदीचे दर ८६१.६० रुपये आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १,०७७ रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीचे दर १०,७७० रुपये आहेत.