सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. पुन्हा सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. हा खरेदीदारांना सणा सुदीच्या काळात मोठा झटका आहे. महागाईच्या आकडेवारी जाहीर होण्यापूर्वीच MCX वर सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्या चांदीला किती दर मिळत आहे.
MCX वर सोन्या-चांदीची किंमत किती?
MCX वर, सकाळी सोन्याच्या दरात सुमारे 0.20 टक्क्यांची वाढ दिसून आली. फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये सकाळी सोन्याचा भाव 72,059 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. डिलिव्हरीसाठी चांदीचा भावही सुरुवातीच्या सत्रात 84,107 रुपये प्रति किलोवर मजबूत होता.
मोठ्या गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची खरेदी
देशांतर्गत बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा परदेशातही त्यांच्या किमती वाढल्या आहेत. आज, सुरुवातीच्या व्यापारात वाढ होण्यासाठी परदेशी वाढीला जबाबदार धरले जात आहेत. वास्तविक, अमेरिकेत किरकोळ महागाईचे आकडे जाहीर होणार आहेत. त्याआधी, बाजारातील अनिश्चितता लक्षात घेता, मोठे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची खरेदी करत आहेत, त्यामुळे भाव वाढले आहेत.
प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचा दर काय?
बंगळुरू: 73,519 रुपये प्रति 10 ग्रॅम
चेन्नई: 73,806 रुपये प्रति 10 ग्रॅम
दिल्ली: 73,519 रुपये प्रति 10 ग्रॅम
कोलकाता: 73,375 रुपये प्रति 10 ग्रॅम
मुंबई: 73,447 रुपये प्रति 10 ग्रॅम
पुणे : 73,231 रुपये प्रति 10 ग्रॅम
प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर काय?
चेन्नई: 91,100 रुपये प्रति किलो
मुंबई : 86,100 रुपये प्रति किलो
दिल्ली: 86,100 रुपये प्रति किलो
कोलकाता: 86,100 रुपये प्रति किलो
पाटणा: 86,000 रुपये प्रति किलो