लसणाच्या फोडणीला महागाईचा ठसका!  किती आहे किलोचा भाव?
लसणाच्या फोडणीला महागाईचा ठसका! किती आहे किलोचा भाव?
img
Dipali Ghadwaje
एकीकडं देशात कांदा-बटाटा यांसारख्या इतर भाज्यांचे भाव कमी झाले असले तरी भाजीपाल्यातील फोडणी मात्र महाग झाली आहे. सध्या लसणाच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. लसणाचा दर हा 400 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. तर काही ठिकाणी लसणारा दर हा 450 ते 500 रुपये प्रतिकिलोवर पोहचला आहे. यामुळं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडल्याची चर्चा सुरु आहे. 

दरम्यान, एकीकडं सर्वसामान्यांना जरी लसूण महाग झाला असेल तरी ज्या शेतकऱ्यांकडे लसूण आहे, त्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचं चित्र दिसत आहे. कोलकाता ते अहमदाबाद एक किलो लसणाचा भाव 450 ते 500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 

देशात लसणाच्या दरात झालेली वाढ ही अवघ्या 15 दिवसात झाली आहे. या काळात 200 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या लसणाचा भाव 300 रुपयांवरुन 500 रुपयांपर्यंत आले आहेत. आठवडाभरापूर्वी 300 रुपये किलोनं विकला जाणारा लसूण आता 500 रुपयांवर गेला आहे. दरम्यान, कोलकाता येथे 15 दिवसांपूर्वी 200 ते 220 रुपये दराने विकला जाणारा लसूण आता 500 रुपयांना विकला जात असल्याची विक्रेत्यांनी दिली आहे. 

यावर्षी लसूण उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं दरात वाढ होत आहे. बाजारपेठेतील बहुतांश पुरवठा पश्चिम बंगालच्या बाहेरुन येतो. मुख्यता महाराष्ट्रातील नाशिकहून मोठ्या प्रमाणात लसणाची निर्यात होते. कोलकात्यातच नाही तर गुजरातमधील अहमदाबादमध्येही लसूण 400 ते 500 रुपयापर्यंत किलोनं विकला जात आहे. याशिवाय दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशमध्ये लसणाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

त्यामुळे टोमॅटो, कांद्यानंतर आता लसूण देखील रडवायला लागला आहे. लसणाचे  सातत्याने वाढत असलेले दर लक्षात घेता आता   लसूण खायचा की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 
 

 

 

  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group