खळबळजनक : भरदिवसा कांदा व्यापाऱ्यावर हल्ला, कुठे घडली घटना?
खळबळजनक : भरदिवसा कांदा व्यापाऱ्यावर हल्ला, कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
अहमदनगर : अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  येथील नेप्ती कांदा मार्केट समोर कांदा व्यापार्‍यावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. व्यापार्‍यावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या जवळील सुमारे 50 लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली आहे. यामुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,आडत आणि कांदा व्यापारी समीर सय्यद हे नेप्ती मार्केटकडे येत असताना बायपास रोडवर त्यांना काही दरोडेखोरांनी घेरले. यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांच्याकडील 50 लाखांची रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या प्राणघातक हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाले आहेत.  

व्यापाऱ्याला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group