पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींसाठी दिलासदायक बातमी !  मासिक पाळी आल्यास मैदानी चाचणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींसाठी दिलासदायक बातमी ! मासिक पाळी आल्यास मैदानी चाचणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय
img
Nandini khandare More

पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान महिला उमेदवारांना मासिक पाळीमुळे अनेकदा शारीरिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना समान संधी मिळावी यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मासिक पाळी आल्यामुळे मैदानी चाचणी देता न आल्यास संबंधित महिला उमेदवारांना चाचणीसाठी मुदतवाढ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो तरुणींना दिलासा मिळणार आहे. नेमका काय आहे हा निर्णय? कोणत्या उमेदवारांना याचा लाभ मिळणार आणि मुदतवाढ मिळवण्यासाठी काय प्रक्रिया असणार? जाणून घेऊया सविस्तर.

पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी  आली तरी त्यांची मैदानी चाचणी आता हुकणार नाही. कारणे अशा उमेदवारांना आरोग्य तपासणीनंतर पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींना फायदा होणार आहे.

पोलीस भरतीसाठी तरुणी अनेक महिने तयारी करत असतात. मात्र, ऐन मैदानी चाचणी ( शारीरिक चाचणी स्पर्धा ) वेळी जर मासिक पाळी तर त्या वेदनांमुळे तरुणींची निराशा होते आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर पडल्या जातात. पोलीस भरतीच्यावेळी अनेक तरुणी आपल्या ऐन मैदानी चाचणीच्या वेळी मासिक पाळी येऊ नये यासाठी प्रार्थना करत असतात. कारण जर चुकून शारीरिक चाचण्या सुरु असताना जर मासिक पाळी आली तर सर्व वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरते आणि भरतीची संधी वाया जात असते. परंतू आता तरुणींची या कारणामुळे संधी हुकणार नाही.

तर मैदान चाचण्यांना मुदतवाढ
मासिक पाळीच्या काळात अनेक तरुणींना हातापायात गोळे येणे, तीव्र पोटदुखी, चक्कर, अशक्तपणा याचा त्रास होत असतो. अशा वेळी १०० मीटर आणि ८०० मीटर धावण्याची चाचणी, गोळाफेक तसेच लांबउडी सारख्या शारीरिक चाचणी परीक्षा देताना अडचणी येतात. यामुळे अनेक तरुणींमध्ये याची धास्ती असते. त्यामुळे त्यांना भरतीची संधी गमावण्याचे टेन्शन असते. त्यामुळे या गोष्टींचा विचार करुन आता राज्य सरकारने पोलीस भरतीतील तरुणींच्या शारीरिक चाचणीच्या वेळी जर मासिक पाळी आली असेल तर त्यांच्या मैदानी चाचण्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर घेण्यात येणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group