अंगावर काटा आणणारं दृश्य !  मांजरीने तोंडात धरून आणलेली वस्तू पाहून हादरले लोक
अंगावर काटा आणणारं दृश्य ! मांजरीने तोंडात धरून आणलेली वस्तू पाहून हादरले लोक
img
Nandini khandare More


बारामती शहरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या ठिकाणी मांजराने अशी काही वस्तू तोंडात धरून आणली कि सर्व नागरिक ते पाहून हादरले. बारामतीमधील आमराई परिसरातील चंद्रमणीनगर येथे हि घटना घडली आहे.  तो प्रकार पाहताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली आणि नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार धावतच घटनास्थळी पोहोचले.

चंद्रमणीनगर परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक मृत अर्भक (मुलगी) पडलेले होते. एका मांजराने हे अर्भक तोंडात धरून रस्त्यावर आणल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. हे अंगावर काटा आणणारं दृश्य पाहून नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळावरून ते सुमारे पाच महिन्यांचे मृत अर्भक ताब्यात घेतले असून, पुढील वैद्यकीय कायदेशीर प्रक्रियेसाठी सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या अमानुष घटनेमागे नेमके कारण काय? याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे तपास सुरू केला आहे. प्राथमिक संशयानुसार, परिसरातील एखाद्या छुप्या रुग्णालयात किंवा घरीच बंदी असलेल्या औषधांच्या माध्यमातून हा बेकायदा गर्भपात करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच, हे रॅकेट अलीकडेच जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कथित गर्भलिंग निदान रॅकेटशी जोडलेले आहे का? या दिशेनेही तपास यंत्रणांनी पडताळणी सुरू केली आहे.

दुसरीकडे, काही खासगी रुग्णालयांकडून बायो-मेडिकल वेस्ट म्हणजेच वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने न लावता ती निष्काळजीपणाने उघड्यावर फेकली गेल्याची शक्यताही तपासून पाहिली जात आहे."हे अर्भक सुमारे पाच महिन्यांचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. काही रुग्णालयांकडून वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली गेली नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके वास्तव समोर येईल."
इतर बातम्या
Join Whatsapp Group