नाशिक : लहवितला सराफी दुकान फोडून 40 तोळे सोन्याचे, 20 किलो चांदीचे दागिने चोरले
नाशिक : लहवितला सराफी दुकान फोडून 40 तोळे सोन्याचे, 20 किलो चांदीचे दागिने चोरले
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सराफी दुकानाचे लोखंडी शटर कशाच्या तरी सहाय्याने वाकवून दुकानातील 40 तोळे सोन्याचे दागिने 20 किलो चांदीचे दागिने व एक लाखाची रोकड असा 56 लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना लहवित येथे घडली.



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संतोष रत्नाकर कुलथे (रा. लहवित, ता. जि. नाशिक) यांचा लहवित गावात माळवाडी येथे सारिका ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाचे लोखंडी शटर कशाच्या तरी सहाय्याने वाकवून दुकानात प्रवेश केला. यानंतर दुकानात असलेली 400 ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, पोत, गंठण, वेल, शिंपल्या, वाट्या, अंगठ्या, ओम्पान, कुडके, बोटातील रिंगा, वेढे, राणीहार, ठुशी, जुन्या बुगड्या, पेंडल, मुरण्या, मणी व जुने सोन्याचे दागिने, तसेच 20 किलोग्रॅम वजनाचे चांदीचे देव, ग्लास, निरंजनी, मूर्ती, अंगठ्या, चेन, पेंडल, पायातील साखळ्या, जोडवे, छल्ला, बिचवे, कमरपट्टा, काटा, शिक्का, देवाचे शिक्के, चांदीची तार व कॉईन अशा दागिन्यांसह एक लाख रुपयांची रोकड असा एकूण 97 लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेला.

या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group