पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या रेव्ह पार्टीमध्ये राज्यातील राजकीय पक्षाच्या बड्या महिला नेत्याचा पती सहभागी झाला होता. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या प्रकरणात पोलिसांनी एकूण ७ जणांना ताब्यात घेतलं आहे यामध्ये ५ पुरूषांचा सहभाग आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी परिसरातील एका फ्लॅटवर ही रेव्ह पार्टी सुरू होती. पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी करत ही मोठी कारवाई केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये राजकीय कनेक्शन उघड झाले आहे. राज्यातील बड्या महिला नेत्याच्या पतीला पोलिसांनी या रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतलं आहे.
खराडीतील एका लॉजमधील फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टीमधून पोलिसांनी २ महिला आणि ५ पुरुषांना ताब्यात घेतलं आहे. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन केले जात होते.
खराडीमधील एका लॉजवर हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत छापेमारी केली.
छापेमारीच्या वेळी फ्लॅटमध्ये २ महिला आणि ५ पुरूष रेव्ह पार्टी करत होते. हे सर्वजण ड्रग्ज, हुक्का आणि दारूचे सेवन करत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त केली आहे.