आनंदराज आंबेडकर उद्या नाशिक दौऱ्यावर;:विविध पक्षांच्या 500 हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या होणार प्रवेश
आनंदराज आंबेडकर उद्या नाशिक दौऱ्यावर;:विविध पक्षांच्या 500 हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या होणार प्रवेश
img
दैनिक भ्रमर



नाशिक- रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा सरसैनी आनंदराज आंबेडकर व ऑड आमन आंबेडकर उद्या दि.9 नोव्हेंबररोजी नाशिक दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता विविध पक्षांच्या 500 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा नासिकल्ब हाऊस येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेश सोहळ्याला विशेष महत्त्व आहे.

नाशिक महानगर तसेच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रिपब्लिकन सेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.ईदू मिलचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांच्या विचार व नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केल्याने या पक्षाला जिल्ह्यात मोठी उभारी मिळाली आहे. सातत्याने नाशिक दौरे करून आनंदराज आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. संविधान वाचविण्यावर त्यांचा विशेष भर असल्याने विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत ही बाब निश्चितच वाखाणण्याजोगी आहे, असेही शिंदे यांनी पुढे नमूद केले.

आगामी महापालिका निवडणुकीचे दृष्टीनेही आनंदराज आंबेडकर यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.  महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी  रिपब्लिकन सेनेची महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर युती करुन महाराष्ट्रात भीमशक्ती शिवशक्ती ची घोषणा करून त्यांनी रिपब्लिकन सेनेला त्यांच्या कोट्यातील दहा टक्के जागा देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे रिपब्लिकन सेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या या दौऱ्यात उमेदवारांची चाचपणी होण्याची शक्यता आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन सेनेचे खाते निश्चितच उघडले जाईल व जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू.नाशकात रिपब्लिकन सेनेचे व्यापक जाळे विणण्यात आले असून सक्षम उमेदवारांची फळी आमच्याकडे असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी महानगर प्रमुख सुनील साळवे हरिफ मंसूरी भीमराव जाधव संजय घोडके सुरेश गांगुर्डे विशाल हिवराळे  उपस्थित होते.

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी,आरक्षणाचा मुद्दा,संविधानाची होत असलेली पायमल्ली, मतदार याद्यांमधील घोळ या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर काय भाष्य करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group