मनमाड : वाईन शॉप मध्ये अज्ञात व्यक्तीने केली चोरी
मनमाड : वाईन शॉप मध्ये अज्ञात व्यक्तीने केली चोरी
img
वैष्णवी सांगळे
मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या निलम वाईन शॉप मध्ये अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली असून सदरील घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे या चोरीच्या घटनेत रोख रकमेसह दारूच्या बाटल्या अज्ञात चोरट्याने चोरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नीलम वाईन शॉप मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर तोडून आत मध्ये प्रवेश करीत रोख रकमेसह दारूच्या बाटल्या चोरून नेल्या असून सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे घटनेची माहिती मिळतच वाईन शॉप चे मालक यांनी पोलिसांना सदरील माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून पुढील तपास करीत आहे. 

दरम्यान महिनाभरातच शहरात चक्क सीसीटीव्ही कॅमेरा असताना देखील चोरी होत असल्याने विविध चर्चेला उधाण आले असून संबंधित प्रशासन करते तरी काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group