नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही म्हसरूळ परिसरात राहते. तिच्या घराच्या परिसरात राहणारा आरोपी किरण अढांगळे (रा. पामगृह सोसायटी, गुलमोहरनगर, दिंडोरी रोड) याने त्याच्या मित्राच्या राहत्या घरी पीडित मुलीला नेले. त्यानंतर अढांगळे याने पीडित अल्पवयीन मुलीच्या गालाला स्पर्श केला. त्यानंतर पीडितेला जबरदस्तीने खाली पाडून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पीडितेने तोंड ताबून जबरीने लैंगिक संबंध केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात किरण अढांगळेविरुद्ध पोक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुरे करीत आहेत.