नाशिक : भागीदारीचा करारनामा करून राज्य उत्पादन शुल्क विभागाची फसवणूक
नाशिक : भागीदारीचा करारनामा करून राज्य उत्पादन शुल्क विभागाची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : मंगल ब्रँडी हाऊसच्या व्यवसायामध्ये भागीदारीचा करारनामा करून मुळ मालक असल्याचे भासवून येवल्याच्या वृद्धाची नेमणूक करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी दीपक श्रीधर पाटील (वय 68, रा. आझाद चौक, येवला) हे व्यापारी असून, शेती करतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 23 नोव्हेंबर 2023 ते 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आरोपी अतुल विजय मदन (रा. पुजा अपार्टमेंट, गोळे कॉलनी, नाशिक) यांनी फिर्यादीची इच्छा नसताना मंगल ब्रँडी हाऊसच्या व्यवसायामध्ये भागीदार होण्यासाठी तसेच फिर्यादी सोबत व्यवसायाचे कामकाज पाहण्याकरीता व्यवस्थापन करार करून घेण्याचे सांगितले. त्या बहाण्याने फिर्यादीला इंग्रजी येत नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपी मदन याने व्यवस्थापन करारनाम्याऐवजी त्याच्या मर्जीनुसार भागीदारी करारनामा करून तो नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात दाखल केला. 

तसेच फिर्यादीच्या व्यवसायात 75 भागीदार असल्याचे कागदपत्र तयार करून घेतले. व तो या व्यवसायात फिर्यादीचा भागीदार असल्याचे भासवून फिर्यादी पाटील व शासनाची फसवणूक केली आहे. त्याचप्रमाणे अतुल मदन याने नोटरी अ‍ॅड. भूमिनी भावसार यांच्याकडून फिर्यादीची पत्नी ज्योती दीपक पाटील व दोन मुलांची संमती नसताना त्यांचे कोर्‍या बॉण्डवर सह्या घेवून फिर्यादीसह पत्नी व मुलांची दिशाभूल केली. त्यानंतर त्यांच्या नावाचे नोटराईज खोटे संमतीपत्र तयार करून घेत ते संमतीपत्र राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला सादर केले आहे.

आरोपीला लाभ होण्याकरीता व तो भागीदार असल्याचे भासविण्यासाठी अतुल मदन याने फिर्यादीच्या नावे बनावट नोकरनामा तयार करुन त्यावर देखील फिर्यादीची खोटी सही करुन त्याचे शासकीय चलन रजिस्टर क्रमांकान्वये भरून या चलनावर त्याने त्याचा पॅन नंबर टाकून तो मुळ मालक व भागीदार असल्याचे भासवून फिर्यादी पाटील यांची फसवणूक केली. त्याचप्रमाणे फिर्यादीच्या व्यवसायात काहीही संबंध नसताना 75 भागीदार होऊन फिर्यादीसह राज्य उत्पादन शुल्क विभागाची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अतुल मदन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. आंचल मुदगल करीत आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group