अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, आक्षेपार्ह व्हिडीओची 'इतक्या' रुपयात होत होती विक्री
अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, आक्षेपार्ह व्हिडीओची 'इतक्या' रुपयात होत होती विक्री
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांनी नाशिक शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान खरातवर नाशिक आणि अहिल्यानगर मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 9 गुन्ह्यांचा तपास 24 सदस्यांची SIT करत आहे. एकूण 12 पैकी 8 गुन्हे हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित असून उर्वरित फसवणुकीचे आहेत. 

दरम्यान या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे पीडित महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आरोपीचे 15 ते 17 अश्लील व्हिडिओ पॉर्न साईट्स, फेसबुक आणि टेलिग्रामवर व्हायरल झाले आहेत. धक्कादायक म्हणजे हे व्हिडिओ पाहण्यासाठी 20 ते 50 रुपये प्रति व्हिडिओ असे दर आकारले जात होते. पीडितांची ओळख उघड करणाऱ्या चार सोशल मीडिया लिंक्सविरोधात आयटी ॲक्टच्या कलम 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक खरातने भक्तांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन मोठी माया जमवल्याचा संशय आहे.  ईडीने या प्रकरणाची दखल घेतली असून SIT कडून सर्व आवश्यक कागदपत्रे मागवून घेतली आहेत. खरातच्या बँक खात्यांची आणि मालमत्तेची चौकशी आता केंद्रीय यंत्रणा करणार आहे. आरोपीच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डची शासन स्तरावर सखोल तपासणी सुरू आहे.

दरम्यान, महिलांचे शोषण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मागील सुनावणी प्रमाणेच सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला व्हिडीओ कॉनफरन्सद्वारे नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच आरोपी अशोक खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करा, असे आदेशही न्यायाधीशांनी दिले.

आरोपी अशोक खरातला दुसऱ्या गुन्हात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आरोपीला सेंट्रल जेलमध्ये दाखल केले जाणार आहे. तिथून पुन्हा आरोपीचा एसआयटी ताबा घेणार अशी माहिती समोर येत आहे.अशोक खरातला मध्यवर्ती कारागृहात हजर करण्याची आणि पुन्हा त्याचा ताबा घेण्याची कायदेशीर प्रक्रिया आजच पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group