मोठी बातमी ! भोंदू अशोक खरात प्रकरणात EDची एन्ट्री; नाशिकमध्ये पथक दाखल
मोठी बातमी ! भोंदू अशोक खरात प्रकरणात EDची एन्ट्री; नाशिकमध्ये पथक दाखल
img
वैष्णवी सांगळे
अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीत आहे आणि त्याची कसून चौकशी सुरु आहे. अशोक खरातच्या पोलीस चौकशीदरम्यान प्रत्येक दिवशी नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला आता मोठं वळण मिळालं असून आता या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाची  (ED) देखील एंट्री झाली आहे. EDचं पथक नाशिकमध्ये दाखल झालं  आहे.माहितीनुसार, EDने खरातविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता खरातच्या मालमत्तांची चौकशी करण्यावर भर दिला जात आहे.

अशोक खरात च्या नावावर असलेल्या मालमत्तांचे कागदपत्र EDकडून तपासले जाणार आहेत. तपास यंत्रणांकडून आधीच खरातच्या मालमत्तांचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून त्या आधारे पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून खरातने महिलांचे लैंगिक शोषण,आर्थिक गैर व्यवहार तसेच इतर काळे कारणामे  केल्याप्रकरणी एसआयटीकडून  तपास सुरू आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात दाखल गुन्हासंदर्भात सुरू असलेल्या तपासाची एसआयटीकडून महत्वाची माहिती देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासानंतर स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते पहिल्यांदाच प्रत्यक्ष साधणार माध्यमांशी संवाद आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group