Ashok Kharat :  इतकं होऊनही भोंदू अशोक खरात अहंकारातच; म्हणाला, दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए!
Ashok Kharat : इतकं होऊनही भोंदू अशोक खरात अहंकारातच; म्हणाला, दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए!
img
वैष्णवी सांगळे
अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीत आहे आणि त्याची कसून चौकशी सुरु आहे. अशोक खरातच्या पोलीस चौकशीदरम्यान प्रत्येक दिवशी नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता नुकतंच पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान अशोक खरातने धक्कादायक विधान केले आहे. 

चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसंच शोषण केल्याची अशोक खरातने कबुल केल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात, ती हातचलाखी असल्याचं अशोक खरातने मान्य केल्याची सूत्रांची माहिती आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असं म्हणत भोंदू अशोक खरातने एसआयटीच्या चौकशीत केलेल्या काळ्या कारनाम्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. 

अशोक खरातवर आतापर्यंत १२ पेक्षा जास्त फसवणुकीचे आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्या प्रकरणी त्याची चौकशी सुरु आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. मात्र इतकं सर्व होऊनही अशोक खरातचा माज उतरला नसल्याचे पाहायला मिळत आहे. चौकशीदरम्यान अत्यंत अहंकारात दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असे विधान खरातने केले आहे. स्वत:च्या कृत्यांचा निर्लज्जपणे बचाव करण्याचा प्रयत्न केल्याच्या पाहायला मिळत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group