नाशिक : दोन इसमांच्या गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक : दोन इसमांच्या गळफास घेऊन आत्महत्या
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहरातील सिडको व पंचवटी परिसरात दोन अज्ञात इसमांनी अज्ञात कारणांतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.

आत्महत्येचा पहिला प्रकार सिडकोत घडला. धनंजय रामेश्‍वर बैरागी (वय 38, रा. दुर्गा माता चौक, प्रताप चौकाजवळ, नवीन सिडको) हे काल (दि. 12) सकाळी 6 वाजेच्या पूर्वी राहत्या घरात किचनमधील सिलिंग फॅनच्या हुकाला साडीच्या सहाय्याने बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस अंमलदार डावरे करीत आहेत.

आत्महत्येचा दुसरा प्रकार हिरावाडीत घडला. बाजीराव सखाराम जाधव (वय 49, रा. पोकार पार्क, शिवम्नगर, हिरावाडी रोड, पंचवटी) यांनी काल (दि. 12) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरी बेडरूममध्ये फॅनला साडीच्या सहाय्याने अज्ञात कारणातून गळफास घेतला. त्यात ते बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने नातेवाईकांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार सानप करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group