पुरुषोत्तम कडलगला
पुरुषोत्तम कडलगला "या" तारखेपर्यंत पोलीस कोठडी
img
दैनिक भ्रमर
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना व्हिआयपी दर्शनाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना न्यायालयाने 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच गोटीराम पेहरेलाही पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती ए.जी. बेहरे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.

यावेळी सरकारी वकिलांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानची व्याप्ती मोठी असून, या प्रकरणाचा तपास करणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच विश्वस्त पदाचा गैरवापर करून हे रॅकेट चालवले जात असल्याचा संशय व्यक्त करत कडलग यांना १० दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. दुसरीकडे संशयित आरोपीच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group