नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक… सकल हिंदू समाजाच्यावतीने शहरात मोर्चा
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक… सकल हिंदू समाजाच्यावतीने शहरात मोर्चा
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याच पार्शवभूमीवर नाशिक शहरात धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळत असून, शहरातील वातावरण तापलं आहे. 



हा मोर्चा कंपनी परिसरातून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला . संबंधित IT कंपनीत घडलेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.  अनेक महिलांनी भगवे वस्त्र परिधान करून, डोक्यावर भगवे फेटे व टोप्या घालून आणि हातात भगवे झेंडे घेऊन सहभाग नोंदवला आहे. तसेच, संबंधित कंपनी  ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅलीही काढण्यात आली. 

दरम्यान या प्रकरणी आयटी कंपनीतील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कंपनीच्या एचआर निदा खान अद्याप फरार आहे. तिचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, आता ज्या नाशिकमधील आयटी कंपनीत अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला होता. त्या कंपनीनं आपलं कामकाज थांबवलं आहे. कर्मचाऱ्यांना कंपनीत उपस्थित न राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

बुधवारी नाशिकच्या आयटी कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झाडाझडती घेण्यात आली आहे. या कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना तूर्त सोमवारपासून Work From Home करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडालेली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group