१३ एप्रिल २०२६
विल्होळी शिवारातील एका हॉटेल जवळ एका इसमावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नुकतीच झाली आहे.
एका महिलेने पुरुषाच्या मदतीने दुचाकीवर असलेल्या इसमावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. जखमी इसम हा दुचाकीवरून जात होता. त्यावेळी त्याला या दोघांनी अडवले. नंतर त्या महिलेने कोयत्याकाढून त्याच्यावर सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
"या माणसाने मला फसवले आहे", असे मारेकरी महिला म्हणत होती, असे घटनास्थळी लोक बोलत होते. त्यावरून हा हल्ला प्रेम प्रकरणातून झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळावरून दोघेही हल्लेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हल्ला झालेल्या इसमाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Copyright ©2026 Bhramar