८ मे २०२६
नाशिक शहरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढतच आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने नाशिकचे रिकक्षाचालक चर्चेत आसतात. आता मात्र हद्दच झाली. नाशिक रोड बस स्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी रिक्षा चालकाकडून सिटी लिंक बस ड्रायव्हरला मारहान केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सिटी लिंक बस चालकांनी अचानक बस बंद आंदोलन पुकारले आहे. सिटी लिंक बस ड्रायव्हर यांनी आचानक बस बंद आंदोलन केल्याने सकाळच्या वेळेस प्रवाशांचे मोठी तारांबळ झाली. कामानर जाण्यासाठी वेळेत बस सेवा उपलब्ध न झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.
नेमकी प्रकरण काय?
नाशिक रोड मार्गावरुन जाणाऱ्या सिटी लिंकच्या बस चालकांनी हा बंद पुकारला आहे. सिटी लिंकची बस स्थानकातून बाहेर काढताना रिक्षाचालकांनी बस चालकाला दमदाटी करत वाद घातला आणि त्यानंतर रिक्षा चालकांच्या टोळक्याने बस चालक लक्ष्मण नायकर यांना मारहाण केली. या घटनेनंतर सिटी लिंक बस चालकांनी बसेस आहे त्या ठिकाणी रस्त्यात सोडून बंद पुकारला. गेल्या दीड तासापासून सिटी लिंक बस चालकांनी बंद पुकारल्यामुळे परिसरातील वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे.
जो पर्यंत संबंधित रिक्षा चालकावर कारवाई होत नाही तो पर्यंत बस धावणार नसल्याची भूमिका बस चालकांनी घेतली आहे. तर दुसरीकडे नाशिक रोड स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे. या घटनेनंतर नाशिक रोडला जाणाऱ्या आणि येणाऱ्या बस फेऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. तर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या काही बसेस शहर पोलिसांनी काही प्रमाणात हलवल्या आहे. दरम्यान, या घटनेनंतर सिटी लिंकचे अधिकारी, बस चालक, युनियनचे पदाधिकारी हे नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल झाले असून रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
Copyright ©2026 Bhramar