कोण होतं TCS धर्मांतर प्रकरणातील टार्गेट? राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालानंतर नवा खुलासा
कोण होतं TCS धर्मांतर प्रकरणातील टार्गेट? राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालानंतर नवा खुलासा
img
दैनिक भ्रमर


नाशिक मधील सध्याचा गंभीर आणि चर्चेचा विषय म्हणजे TCS प्रकरण , या प्रकरणात आता अनेक नवीन आणि धकाकदायक खुलासे समोर येत आहेत . या प्रकरणात आता नक्की कोणाला  टार्गेट केलं गेलेलं आहे याचा अहवाल आता समोर आल्याची माहिती आहे.

TCS मधील महिला कर्मचाऱ्यांच्या अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नांच्या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘सत्यशोधन समिती’ने धक्कादायक निरीक्षणे नोंदवली आहेत. समितीच्या अहवालानुसार, संशयित दानिश, तौसीफ आणि रझा मेमन या त्रिकुटाने नाशिक येथील टीसीएस कार्यालयावर प्रभाव निर्माण करून विशेषतः तरुण महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले होते.अहवालात विशेषतः ‘जनरेशन झेड’मधील तरुणींना मानसिक, भावनिक आणि धार्मिक दबावाखाली आणण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

समितीच्या अहवालानुसार, संशयितांनी पीडित महिलांचे लैंगिक आणि मानसिक शोषण करण्याबरोबरच हिंदू धर्म आणि परंपरांबाबत अपमानास्पद वक्तव्ये केली. इस्लाम धर्म श्रेष्ठ असल्याचे सांगून धार्मिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.ज्या महिला कर्मचाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यांना बदली किंवा नोकरी गमावण्याच्या धमक्या देऊन गप्प करण्यात आल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.साधारणपणे १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेल्या तरुण पिढीला ‘जनरेशन झेड’ म्हटले जाते.

तंत्रज्ञानाच्या वातावरणात वाढलेली ही पिढी सध्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहे.महिला आयोगाच्या अहवालानुसार, कमी वय आणि नोकरी टिकवण्याची गरज यामुळे या वयोगटातील तरुणींना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. त्यांचे मानसिक खच्चीकरण करून धार्मिक ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न झाल्याचे समितीने नमूद केले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group