नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक क्रिकेट असोसिएशन तर्फे जलदगती गोलंदाजांची शोध मोहीम सुरू आहे.
स्पीड गनच्या सहाय्याने गोलंदाजांच्या वेगाची चाचणी घेण्यात आली. महिलांमध्ये खुल्या गटात धनश्री काकड व आरोही सानप, मुलांच्या खुल्या गटात रोहन शेंडगे आणि आकाश शेलार हे सुपरफास्टर ठरले.
स्पर्धेच्या उद्घाटनवेळी एनडीसीएचे अध्यक्ष धनपाल शाह, सचिव समीर रकटे, विनोद यादव, तरुण गुप्ता, फय्याज गंजीफ्रॉकवाला, के. व्ही. जोशी, गोपी जाधव, विभास वाघ आदी उपस्थित होते. यासाठी प्रमुख पाहुणे व निरीक्षक महाराष्ट्राचे माजी रणजीपटू व गोलंदाज प्रशिक्षक अनुपम संकलेच्या हे उपस्थित होते.
सोळा वर्षातील मुलींमध्ये आरोही सानप हिने 77 ताशी किलोमीटर वेगाने चेंडू फेकला. मुलींच्या खुल्या गटात धनश्री काकड हिने 105 तर वैष्णवी फटांगरे 100 ताशी किलोमीटर वेगाने चेंडू टाकला. खुल्या गटात या दोघी अनुक्रमे प्रथम व द्वितीय आल्या.
मुलांमध्ये सोळा वर्ष आतील गटात विहान हेकरे याने 117, शिवम केवट याने 113 ताशी वेगाने चेंडू टाकला. खुल्या गटात मुलांमध्ये रोहन शेंडगे याने 129 तर आकाश शेलार याने प्रतिताशी 126 वेगाने चेंडू टाकला. खुल्या गटातील विजेत्यास 5000, उपविजेते तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
सोळा वर्षातील वयोगटातील प्रथम व द्वितीय विजेत्या गोलंदाजास अनुक्रमे 3000 व दोन हजारांची बक्षीस देण्यात आली. इतर अनेक बक्षीस त्यांना देण्यात आले