स्टार मॉलमध्ये आगीचे तांडव! धुराचे साम्राज्य आणि रुग्णांचा जीव टांगणीला; मोठी वित्तहानी, सुदैवाने जीवितहानी टळली
स्टार मॉलमध्ये आगीचे तांडव! धुराचे साम्राज्य आणि रुग्णांचा जीव टांगणीला; मोठी वित्तहानी, सुदैवाने जीवितहानी टळली
img
नितीशा कुलकर्णी









नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशीकरोड परिसराती  स्टार मॉलला भीषण आग लागली. या मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल असल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते. रुग्ण आणि डॉक्टरांनी वेळी बाहेर धाव घेतली. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये  स्टार मॉलमध्ये संध्याकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अचानक आग लागल्यामुळे सगळीकडे धुराचं साम्राज्य पसरलं. या मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहे. त्यामुळे सगळीकडे धूर पसरल्यामुळे एकच गोंधळ उडाला. हॉस्पिटलमधून रुग्णांना वेळीच बाहेर काढण्यात आलं. संपूर्ण मॉलमध्ये धुराचं साम्राज्य पसरलं. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले.  आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे शर्थीचे प्रयत्न केले. रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

आग बघण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला अडथळे येत होते. सुदैवाने या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर राबवण्यात आलं. अखेरीस २ तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं.. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र, मोठ्या प्रमाणात कारचं नुकसान झालं आहे. अनेक वाहनं ही मॉलच्या पार्किंगमध्ये उभी होती, स्टार मॉलला लागलेल्या  आगीमुळे काही वाहनांना आग लागली होती. यात अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group