महिलांवरील होणारे कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून किरकोळ वादातून स्त्रियांना अत्यंत वाईट आणि निर्दयी वागणूक देण्यात येत आहेत. अशीच एक धक्कादायक बातमी नाशिकमधून समोर आली आहे. सुनेने बनवलेली कढी आवडली नाही म्हणून विवाहितेसोबत अत्यंत निर्दयी कृत्य सासू आणि पतीने केली असल्याची घटना घडली आहे.
या घटनेवरून कुटुंबाची विकृत मानसिकता समोर आणेल अशी कोणालाच कल्पना नव्हती. फक्त एका साध्या कारणावरुन नाशिक शहरात जे काही घडलं आहे,त्यामुळे नात्यांमधील सर्व क्रुरतेची सिमा ही पार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक परिसरात एका घरात सर्व धक्कादायक प्रकार घडलेला आहे. पीडित 34 वर्षीय महिला ही नेहमी प्रमाणे सर्वांसाठी आवडीने जेवण बनवत होती. त्यानुसार तिने कढी केली होती. जेवणासाठी सर्व आले असताना तिने पती आणि सासूलाही ती कढी दिली. मात्र,सासूला आणि पती त्या कढीची चव आवढली नाही. त्यावरुन त्यांनी महिलेशी घरात वाद घालण्यास सुरुवात केली.
एवढ्यावर ते थांबले नाही तर त्यांनी महिलेला एकत्र येत मारहाण करण्यास सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे मारहाण सुरु असताना सासू आणि पतीने जी गॅसवर उकळती कढी होती तिच विवाहित महिलेच्या अंगावर ओतली. उकळती कढी अंगावर पडल्याने विवाहित महिला वेदनेने किंचाळू लागली. या घटनेचा महिलेच्या शरीराचा बराच भाग भाजला गेला असून जवळच्या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलेले आहे.
धक्कादायक घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी रुग्णालयात धावत घेत पीडित महिलेचा जबाब नोंदवला आणि या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे नाशिक शहरातून आरोपींचा संताप व्यक्त होत आहे.