१२ मे २०२६
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आता खरात प्रकरणामुळे आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाशिकमधील कथित भोंदू अशोक खरात प्रकरणात अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशीनंतर आता ईडी देखील सक्रिय झाली असल्याची माहिती आहे . विशेष तपास पथकाच्या चौकशीनंतर आर्थिक व्यवहारांबाबत अधिक तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही आर्थिक व्यवहार, संस्थांशी संबंधित कागदपत्रे आणि निधीच्या हालचालींबाबत चौकशी यंत्रणा माहिती गोळा करत आहेत. याप्रकरणी संबंधितांना नोटीस पाठवण्यात आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी विशेष तपास पथकाने चाकणकर यांची अनेक तास चौकशी केल्याची माहिती समोर आली होती. या चौकशीत निधीचा वापर, संस्थात्मक व्यवहार आणि काही आर्थिक देवाणघेवाणींचा तपास करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याच्यावर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. कथित बेनामी खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या पैशांचा वापर नेमका कुठे झाला आणि त्यातून कोणाला फायदा झाला याचा तपास यंत्रणा करत आहेत. दरम्यान , SIT नंतर आता ED देखील सक्रिय झाल्याने राज्यातील राजकीय वातावरणात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Copyright ©2026 Bhramar