येवल्यात 'एक्साइज 'ची मोठी कारवाई; १.४७ कोटींचा मुद्देमाल जप्त
येवल्यात 'एक्साइज 'ची मोठी कारवाई; १.४७ कोटींचा मुद्देमाल जप्त
img
दैनिक भ्रमर


 येवला प्रतिनिधी दीपक सोनवणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाने अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत १ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गोवानिर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या विदेशी मद्याचा मोठा साठा हस्तगत न करण्यात आला.

गोवा राज्यातून नाशिक जिल्हामार्गे नंदुरबारकडे विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क  विभागाला मिळाली होती.  त्यानुसार मंगळवारी (दि. १२) शहरातील विंचूर चौफुलीपरिसरातील डॉ. आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर सापळा रचण्यात आला.

कारवाईदरम्यान एमएच-५० एन-३५५३ क्रमांकाचा टाटा अल्ट्रा ट्रक अडवून तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये व्हिस्कीच्या ५७ हजार ६०० सिलबंद बाटल्या आढळून आल्या. या मद्यसाठ्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे १ कोटी २६ लाख ७२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी रवि मधुकर आवळे (वय २७) आणि अक्षय राजेंद्र साबळे (वय ३०, रा. सोलापूर) या संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईत अवैध मद्यसाठ्यासह २० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि तीन मोबाईल संच असा - एकूण १ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेंद्र देशमुख आणि - सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विभागीय उपआयुक्त उषा वर्मा, अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक अमृत तांबारे आणि निरीक्षक शैलेंद मराठे यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रवीण राधाकृष्णा मंडलिक करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group