निदा खानची सर्वात मोठी स्पष्ट कबुली !
निदा खानची सर्वात मोठी स्पष्ट कबुली !
img
Nandini khandare More

नाशिकमधील  TCS प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असून या प्रकरणात दर दिवशी मोठं -मोठे खुलासे होत आहेत. दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आता या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानने आता सर्वात मोठी कबुली दिली आहे.  तिने चौकशीदरम्यान अनेक खळबळजनक खुलासे केले आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कोठडीत असलेल्या निदा खानची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिने आपला गुन्हा मान्य केला आहे. "होय, मीच पीडितेला माझ्या घरी घेऊन गेले होते आणि तिथे तिला नमाज पठणाचे प्रशिक्षण दिलं" अशी स्पष्ट कबुली निदा खानने तपास यंत्रणांसमोर दिली आहे. एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचं अशा प्रकारे ब्रेनवॉश करून तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याच्या या कबुलीमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

या संवेदनशील प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस अत्यंत गांभीर्याने करत आहेत. या रॅकेटचे धागेदोरे कुठेकुठे पसरले आहेत, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल केले आहे. उद्यापासून म्हणजे ९ जूनपासून या प्रकरणी नियमित सुनावणी होणार आहे.

निदा खानच्या या थेट कबुलीमुळे हे प्रकरण केवळ लैंगिक छळापुरते मर्यादित नसून, यामागे एक मोठे संघटित धर्मांतर रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीडित तरुणीवर नेमका कसा दबाव आणला गेला? या कटात कंपनीतील किंवा बाहेरील आणखी किती लोकांचा सहभाग आहे? याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group