भेसळ रोखण्यासाठी मंत्री झिरवाळही मैदानात; पहाटे दूध बाजारात अधिकार्‍यांसह मारला छापा
भेसळ रोखण्यासाठी मंत्री झिरवाळही मैदानात; पहाटे दूध बाजारात अधिकार्‍यांसह मारला छापा
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (चंद्रशेखर गोसावी):-  अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दूध बाजारामध्ये भल्या पहाटे अचानक प्रवेश केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. या ठिकाणी त्यांनी काही दुधाचे नमुने देखील घेतले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाबाबत नाराजीचा सूर होता. अलीकडच्या काळामध्ये याच विभागात मंत्रालयात काम करणार्‍या एका लिपिकाला लाच घेताना देखील पकडण्यात आले होते. असे प्रकार घडत असताना या विभागाचा कारभार राज्याचे ज्येष्ठ आयएसएस अधिकारी आणि शिस्तीचे भोक्ते असलेले तुकाराम मुंढे यांच्याकडे देण्यात आला आहे.

मुंढे यांनी या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारवाया राज्यभर सुरू केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  नाशिक दौर्‍यावर असलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज पहाटे  जुन्या नाशिक परिसरात असलेल्या दूध बाजारात आपल्या विभागातील अधिकार्‍यांसह छापा टाकला आणि शहरात होणार्‍या दूध पुरवठ्यासंदर्भात माहिती घेतली. तसेच काही दूध विक्रेत्यांकडील दुधाचे नमुने देखील तपासणीसाठी घेतले आहेत.

अचानकपणे खुद्द मंत्रीमहोदयच दूध बाजारात आल्यामुळे काही काळ दूधविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group