‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे. दरम्यान हा चित्रपट चर्चेचा विषय ठरलेल्या काही प्रकणांवरून बनविण्यात येत आहे अशी चर्चा असताना च ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ या चित्रपटाचे काही फोटोज समोर आल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आह.
या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून त्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सय्यद यांचा या भूमिकेतील फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत अशी वेशभूषा, देहबोली आणि लूक पाहून अनेकांनी त्यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.
चित्रपटाच्या कथानकाबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे फारशी माहिती दिलेली नसली तरी हा चित्रपट महाराष्ट्रातील काही गाजलेल्या घटनांवर भाष्य करणारा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये त्याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.
दरम्यान, चित्रपटातील आणखी एका महत्त्वाच्या पात्राची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबाबत मात्र निर्मात्यांनी कमालीची गोपनीयता राखली आहे. भोंदू खरात या चर्चेत असलेल्या पात्राची भूमिका नेमका कोणता अभिनेता साकारणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.