लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच गिफ्ट !हफ्ता जमा होण्यास सुरुवात ;₹1500 की ₹3000 आताच तपासा
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच गिफ्ट !हफ्ता जमा होण्यास सुरुवात ;₹1500 की ₹3000 आताच तपासा
img
Nandini khandare More
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना एक गुड न्यूज समोर आली आहे. महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार की ३००० रुपये याबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 

 राज्य सरकारकडून सध्या फक्त जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता वितरित केला जात आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकाचवेळी जमा होतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, सध्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नसून पात्र महिलांना जुलै महिन्याचेच १५०० रुपये मिळणार आहेत. खळबळजनक ! काँग्रेस नेत्याच्या घरावर मध्यरात्री गोळीबार ; कुठे घडली घटना ?

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रोसेस सुरू झाली आहे. पुढच्या २ ते ३ दिवसांत पात्र लाभार्थी महिलांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group