खळबळजनक !  काँग्रेस नेत्याच्या घरावर  मध्यरात्री गोळीबार ; कुठे घडली घटना ?
खळबळजनक ! काँग्रेस नेत्याच्या घरावर मध्यरात्री गोळीबार ; कुठे घडली घटना ?
img
Nandini khandare More

 राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या घरावर अज्ञातांनी थेट गोळीबार केला असल्याची धक्कादायक  घटना घडली आहे. या घटनेमुळे  राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या  माहितीनुसार, नागपूर शहरातील प्रभाग क्रमांक २६ चे काँग्रेस नगरसेवक शुभम शेषराव मोटघरे यांच्या घरावर अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. श्रावणनगर परिसरातील स्वामीनारायण मंदिराच्या मागे त्यांचे घर आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री साधारण साडेबारा वाजेच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती मोपेड दुचाकीवरून आली होती. या व्यक्तीने आपला चेहरा पूर्णपणे कपड्याने बांधलेला होता. या अज्ञाताने थेट मोटघरे यांच्या घरावर गोळी झाडली आणि तिथून पळ काढला.

 रात्रीच्या शांततेत अचानक मोठा आवाज झाल्याने आणि घराची काच फुटल्याने शुभम मोटघरे यांना संशय आला. त्यांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने गोळीबार केल्याचे स्पष्टपणे दिसले. त्यानंतर लगेचच पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

आमदारांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी, एसीपी (ACP) आणि डीसीपी (DCP) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे हे देखील मध्यरात्रीच मोटघरे यांच्या घरी दाखल झाले.

आरोपीचा शोध सुरू सध्या पोलिसांकडून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात आली असून, हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा गोळीबार नेमका कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, लोकप्रतिनिधीच्या घरावरच थेट गोळीबार झाल्यामुळे श्रावणनगर परिसरात मोठी दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आता या अज्ञात आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group