धक्कादायक ! खासदारांच्या शोरूममध्ये चोरी; नेमकं काय घडलं?
धक्कादायक ! खासदारांच्या शोरूममध्ये चोरी; नेमकं काय घडलं?
img
Nandini khandare More
नांदेडमध्ये चोरीची एक धक्कादायक घटना घडली असून, यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार शोरूममध्ये चोरट्यांनी हात साफ केला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी शोरूममध्ये प्रवेश करत थेट तिजोरीच पळवून नेली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अखेर चोरट्यांनी किती रुपयांवर डल्ला मारला? पोलिसांच्या तपासात काय समोर आले? जाणून घेऊया या घटनेचा सविस्तर तपशील...

खासदार अशोक चव्हाण यांच्या मालकीच्या जया हुंडाई कार शोरूममध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी शोरूममधील पैसे किंवा इतर वस्तू चोरण्याऐवजी थेट तिजोरीच घेऊन पळ काढला. ही संपूर्ण घटना शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री सुमारे ९ वाजून ३ मिनिटांनी दोन चोरटे शोरूममध्ये शिरले. रात्रीच्या वेळी शोरूममध्ये कोणी नसल्याची संधी साधत त्यांनी चोरीचा डाव आखला. त्यानंतर त्यांनी शोरूममधील तिजोरी उचलली आणि तेथून पळ काढला. काही वेळातच चोरट्यांनी तिजोरीसह घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोरूमची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच शोरूममधील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या चोरट्यांच्या हालचालींच्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. चोरट्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, चोरट्यांनी पळवून नेलेल्या तिजोरीमध्ये नेमकी किती रक्कम होती, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे चोरीला गेलेल्या रकमेचा आकडा स्पष्ट झालेला नाही. भरवस्तीत असलेल्या कार शोरूममध्ये अशा प्रकारे तिजोरीच पळवून नेल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस या चोरट्यांपर्यंत कधी पोहोचतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group