'तिने मला प्रेमात फसवलं ! तरुणाचीआत्महत्या; चिठ्ठीत प्रेयसीवर आरोप अन शिक्षेची मागणी
'तिने मला प्रेमात फसवलं ! तरुणाचीआत्महत्या; चिठ्ठीत प्रेयसीवर आरोप अन शिक्षेची मागणी
img
Nandini khandare More
प्रेमप्रकरणातून आजकाल अनेक गंभीर घटना घडत आहेत. प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्या, आत्महत्या, फसवणूक अशा अनेक घटना साह्य उघडकीस येत असून आता नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

नाशिकच्या गंगापूर रोडवरील ध्रुवनगरमध्ये 26 वर्षीय वरुण भामरे या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रेयसीसह तिघांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘प्रेमात फसविले, माझ्याकडून हवे तेवढे कॅश काढून घेतले’ असा चिठ्ठीत उल्लेख  केला आहे. ‘काल रस्त्यात अडवून मारहाण केली, तू मर नाही तर...’ अशी धमकी दिल्याचा आरोप त्याने केला आहे. संबंधितांकडून घेतलेले पैसे परत मागितल्याने धमकावल्याचा वरुणचा दावा आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे चिठ्ठीतून न्यायाची मागणी देखील केली आहे, त्याचबरोबर ‘यांना शिक्षा करा’ अशी विनंती देखील त्याने शेवटच्या चिठ्ठीत केली आहे. गंगापूर पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली असून अकस्मात मृत्यूची  नोंद केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

'तिने मला प्रेमात फसवले, हवे तेवढे कॅश काढून घेतले अन् मला धमकावून तू मर नाही तर...' असे सांगून रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा आरोप 'सुसाइड नोट'मध्ये करत एका वरुण भाऊसाहेब भामरे (२६, रा. गोकुळधाम, ध्रुवनगर, गंगापूर) याने गुरुवारी (दि.२०) सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्याने संबंधितांची नावे चिठ्ठीत लिहून न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगून 'प्रतिक्षा करावी लागली तरी चालेल, पण यांना शिक्षा करा' अशी थेट पोलिस आयुक्तांकडे मागणी केली आहे. गंगापुररोडवरील ध्रुवनगरमध्ये राहणाऱ्या वरुणचे एका युवतीवर प्रेम होते. त्याने आयटीआयपर्यतचे शिक्षण घेतले होते. तो आपल्या कुटुंबासमवेत गोकुळधाम सोसायटीत राहत होता. त्याने राहत्या घरात त्याच्या रूममध्ये अचानकपणे काल (गुरुवारी, ता २०) सायंकाळी चिठ्ठी लिहून गळफास घेत जीवन संपवले आहे.

वरूणला बेशुद्धावस्थेत त्याचा मावसभाऊ तेजस पवार याने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून वरुणला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, दोन बहिणी, काका असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने ध्रुवनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी वरुणने मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

कमिश्नर संदीप कर्णिक सर माझ्या मरण्यामागे हे हे तिघे आणि तिचे भाऊ आहे. काल त्यांनी मला रस्त्यात अडवून मारलं आणि धमकी दिली, की तू मर नाही तर...' त्यांना माझे घेतलेले कॅश द्यायचे नाही वन टाइम, त्यामुळे माझ्यावर काहीही आरोप लावला आहे. तिने मला प्रेमात फसवले व माझ्याकडून हवे तेवढे कॅश काढून घेतले. मी माझे कॅश वन टाइम मागितले तर तुझी वाट लावू अशी धमकी देतात. संदीप कर्णिक सर माझी तुम्हाला विनंती आहे, मोठे माणसे पैशांच्या जीवावर काहीही करु शकता, पण मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. प्रतिक्षा करावी लागली तरी चालेल पण यांना शिक्षा करा, असंही वरूणने म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group