लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्माला आलेल्या बाळाचा सौदा ! जन्मदात्या आईकडून अवघ्या एका महिन्याच्या बाळाची 1 लाखांना विक्री
लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्माला आलेल्या बाळाचा सौदा ! जन्मदात्या आईकडून अवघ्या एका महिन्याच्या बाळाची 1 लाखांना विक्री
img
Nandini khandare More
अवघ्या एका महिन्याच्या  बाळाला आईने १ लाख २० हजार रुपयांना विकल असल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  लिव्ह-इन रिलेशनशिपच्या संबंधातून महिलेने बाळाला जन्म दिला. अवघ्या एका महिन्याच्या निष्पाप बाळाला आईने १ लाख २० हजार रुपयांना विकले. ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडीतल्या संजयनगरमध्ये घडलेल्या घटनेत स्वतः बाळाची आई या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. मुकुंदवाडी पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर जन्मदात्यांसह खरेदीदार मायलेकींवर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. बाळाची ३६ वर्षीय आई गेली काही वर्षे मुंबईत वास्तव्यास होती. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती तिच्या पहिल्या मुलीला सोडून ३ वर्षापासून ३४ वर्षीय प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

महिलेचा प्रियकर देखील मुलगा आणि पत्नीला सोडून राहतो. तो दारूच्या आहारी गेला आहे. ३६ वर्षीय महिलेने ५ जुलै रोजी घाटी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. रुग्णालयातच तिची ओळख ६५ वर्षीय कौशल्या बारकू पवार (६५ वर्षे, राहणार संजयनगर) या स्वयंपाक काम करणाऱ्या महिलेसोबत झाली. तिने 'तुझा नवरा दारू पितो, तो तुझा आणि बाळाचा सांभाळ कसा करणार?' असा तिच्या मनात संशय निर्माण केला.

'माझी मुलगी सीमा अनिल रेशवाल (३३ वर्षे, रा. संजयनगर) बाळ विकत घेते. ते बाळ मला दे, आम्ही त्याचा नीट सांभाळ करू' असे सांगून कौशल्या पवार यांनी त्या दोघांना जाळ्यात ओढले. त्यानंतर कौशल्याच्या सांगण्यावरून बाळाच्या आईने आपल्या बाळाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. तिने १ लाख २० हजारात त्यांची विक्री केली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी जन्मदात्या आईसह बाळाच्या खरेदीत सहभागी असलेल्या चौघांना अटक केली. या धक्कादायक प्रकाराचा पुढील तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group