गेल्या अनेक दिवसांपासून वाहनांची वर्दळ आणि भरधाव वाहने यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या भीषण अपघातांत अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. दरम्यान आता अशाच एका भीषण अपघाताची बातमी आता समोर आली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील अटगावजवळ भीषण अपघात झाला असून यात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनासथळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्तांना तात्काळ अपघातग्रस्तांना रूग्णालयात पाठवले. पण डॉक्टरांनी चौघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी मुंबईतील जोगेश्वरी येथील रहिवासी होते. ते आपल्या कुटुंबासह त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन उरकून परत येत असताना अटगावजवळ रस्त्याच्या कडेला दोन वर्षांपूर्वी जळालेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या एका ट्रकला त्यांच्या वाहनाने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की चौघांचा जागीच मृत्यू झाला. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातातील ६ जखमींवर सध्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींची नावे सुभी जैस्वाल शिवम जैस्वाल हाशिक जैस्वाल सुनीता जैस्वाल राधिका जैस्वाल सतीश जैस्वाल संतराम जैस्वाल मयत नावे श्रीराम जैस्वाल आयुष जैस्वाल लाडो जैस्वाल सुरज जैस्वाल असे आहेत.