मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर; यादीत कोणाकोणाचे नाव ?
मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर; यादीत कोणाकोणाचे नाव ?
img
Nandini khandare More
राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरु असून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. असून या सर्व प्रवक्त्यांवर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर

राष्ट्रवादीच्या या बैठकीनंतर 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, अॅड. फैजल मिर्झा, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत सोनबा वीरकर, अॅड. हेमाताई पिंपळे, डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे.पुढील 24 तासांत पावसाचा कहर? महाराष्ट्रासह 26 राज्यांना अलर्ट

समोर आलेल्या माहितीनुसार, आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे महत्त्वाचे नेते हजर होते. यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार डॉ अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजियाताई खान, राजेंद्रजी शिंगणे, माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार उपस्थित होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group