विद्यानंद बापटांवर हल्ला करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
विद्यानंद बापटांवर हल्ला करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
img
Nandini khandare More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या डीजेविरोधी भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण नाराज झालेत. आज सकाळी एक वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना विद्यानंद बापट यांना एका तरुणाने मारहाण केली. दरम्यान आता विद्यानंद बापट यांना हल्ला प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याने बापट यांना मारहाण का केली याचा तापस पोलिसांकडून केला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.

 मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बापट हे कशाळे चौक परिसरात माध्यम प्रतिनिधींना मुलाखत देत होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. बापट यांना मारहाण करणाऱ्यांला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याचे नाव संतोष चव्हाण आहे. तो पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत असल्याचे सांगितलं जातंय. राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याचीही माहिती समोर आलीय.

बापट यांच्यावर हल्ला केलेल्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याची पोलीस चौकशी सुरू आहे. नेमकं त्याने हे कृत्य का केलं याचा तपास सुरूय. अशा कुठल्या प्रकारच्या घटना कोणी केल्या तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण असं कोणी केलं तर त्याच्यावर नक्की कारवाई होणार. गणेश मंडळांच्या प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक झालीय. त्यांच्याकडून सुद्धा आता ४ बेस आणि ४ टॉप साठी तयारी दाखवण्यात आलीय.शासनाने जो निर्देश दिलाय, त्याचे पालन सगळ्या आयोजकांनी केलं पाहिजे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group