अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुंज ?? बातमी पाहताच अभिनेता भडकला; म्हणाला...
अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुंज ?? बातमी पाहताच अभिनेता भडकला; म्हणाला...
img
Nandini khandare More
मनोरंजन विश्वातील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याविषयीचा पसरविल्या जाणाऱ्या अफवा हा काही नवा विषय नाही. पण यावरून अनेक मोठे वाद निर्माण झाले आहेत. दरम्यान आता मनोरंजन विश्वातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा पसरवली जात आहे, यामुळे स्वतः अभिनेताच चांगला संतापला आहे. आपल्या कॉमेडी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या  मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवली जात आहे. स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहताच सिद्धार्थ जाधव भडकला. थेट व्हिडीओ शेअर करून त्याने कानउघाडणी केली आहे.

सिद्धार्थ जाधवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तो आपल्या मोबाईलमध्ये आलेली स्वतःच्या मुत्यूची खोटी बातमी दाखवत आहे. युट्यूबवर एका चॅनेलवर दिसत आहे की, "अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज, गंभीर आजार" अशी बातमी चालवली जात आहे. हे पाहून सिद्धार्थ जाधवला हसू अनावर झाले असून त्याने स्पष्ट शब्दात याचा निषेध केला आहे. अभिनेत्याने तो ठणठणीत बरा असून आपल्या कामात व्यस्त असल्याचे सांगितले आहे.

सिद्धार्थ जाधवची पोस्ट "नमस्कार मी ठणठणीत बरा आहे. व्यवस्थित ॲनिमलचे प्रयोग, धिंगाणाचं shoot suru aahe... ज्या ज्या लोकांनी काळजीने msg /call केलेत, त्यांना मनापासून धन्यवाद! बातमीदार जरा मला तरी विचारा...एवढी कसली घाई आहे तुम्हाला??? ज्याने Headline /coverage बनवलाय, त्याला तर Nobel द्याच... Man is a more dangerous Animal than an 'ANIMAL'

सिद्धार्थ जाधवने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत. तसेच सिद्धार्थ जाधवचे चाहते चांगलेच भडकले आहेत. . 

इतर बातम्या
Join Whatsapp Group