अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली ! उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल
अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली ! उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल
img
Nandini khandare More

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक खालावल्याची  माहिती समोर आली आहे. प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची सद्यस्थिती काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अण्णा हजारे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुंबईत आणण्यात आले. सध्या हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून आहे. आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या आणि उपचार सुरू करण्यात आले आहेत. अण्णांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राज्यभरातून आणि राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे. ते लवकरात लवकर आणि पूर्णपणे सुखरूप बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अन्ना हजारे यांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र अस्वस्थता जाणवत होती. त्यांना गंभीर व्हायरल इन्फेक्शनशरीरातील पाण्याचे प्रमाण प्रचंड कमी होणे आणि मूत्रपिंडाशी  संबंधित समस्या निर्माण झाल्या आहेत. सुरवातीला त्यांच्यावर राळेगणसिद्धीजवळील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु रक्तातील क्रिएटीनिनची पातळी वाढल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे मुंबईत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 डॉक्टरांचे पथक सतर्क बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डॉ. गौतम भंसाली यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या (Medical Tests) केल्या जात आहेत. चाचण्यांचे संपूर्ण अहवाल आल्यानंतर पुढील उपचाराची दिशा निश्चित केली जाईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
_____________________________
इतर बातम्या
Join Whatsapp Group