LPG ग्राहकांनो ३१ ऑगस्टपर्यंत 'हे' काम कराच !  अन्यथा सिलिंडर मिळणार नाही
LPG ग्राहकांनो ३१ ऑगस्टपर्यंत 'हे' काम कराच ! अन्यथा सिलिंडर मिळणार नाही
img
Nandini khandare More
LPG ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या अपडेट नुसार  LPG बाबत एक अत्यंत महत्वाचं काम ३१ ऑगस्ट पर्यंत करावं लागणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. 

सरकारी तेल कंपन्यांनी LPG कनेक्शनसाठी e-KYC आणि आधार व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत पुन्हा वाढवली आहे. आता ग्राहकांना ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ई -केवायसी पूर्ण करता येणार आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप ही प्रक्रिया केलेली नाही, त्यांना कंपन्यांकडून मेसेजद्वारे ई -केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान असे न केल्यास घरगुती सिलेंडर मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

घरगुती LPG सिलिंडरचे कनेक्शनसाठी ई -केवायसी करणे महत्त्वाचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ई -केवायसीची मुदत दुसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी आधार व्हेरिफिकेशनसाठी १६ ऑगस्ट ही अंतिम तारीख होती. मात्र त्यानंतर ती वाढवून २३ ऑगस्ट करण्यात आली होती. आता पुन्हा मुदत वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे ३१ तारखेपूर्वी हे काम न केल्यास तुमच्या घरी सिलिंडरची सेवा पोहोचणे कठीण होऊ शकते.

e-KYC न केल्यास काय होऊ शकते? ठरलेल्या मुदतीपर्यंत ई -केवायसी पूर्ण न केल्यास ग्राहकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात विकला जाणारा LPG सिलेंडरचा लाभ तात्पुरता थांबवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत ई -केवायसी पूर्ण होईपर्यंत ग्राहकांना सिलेंडर कमर्शियल दराने घ्यावा लागू शकतो. हा दर घरगुती LPG सिलेंडरच्या तुलनेत अधिक असतो. याशिवाय काही ग्राहकांची सिलेंडर बुकिंग प्रक्रिया थांबू शकते. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणारी सब्सिडीही बंद होण्याची शक्यता आहे. हा नियम जुन्या तसेच नवीन LPG ग्राहकांसाठी लागू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केवळ ई -केवायसी न केल्यामुळे लगेच LPG कनेक्शन रद्द होणार नाही. दीर्घकाळ प्रक्रिया पूर्ण न केल्यास कनेक्शन ब्लॉक होण्याची शक्यता आहे.

मोबाइलवरूनही करता येते e-KYC ग्राहकांना ई -केवायसी करण्यासाठी गॅस एजन्सीत जाण्याची गरज नाही. ही प्रक्रिया ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येते. मोबाइलवरून ई -केवायसी करण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या LPG कंपनीचे अधिकृत अॅप डाउनलोड करा. इंडेन, HP गॅस किंवा भारत गॅस यांच्या अॅपमध्ये ई -केवायसीचा पर्याय उपलब्ध असतो. संबंधित पर्याय निवडून आवश्यक माहिती आणि आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता ग्राहकांनी ३१ ऑगस्टपूर्वी ई -केवायसी पूर्ण करून घेणे फायदेशीर ठरेल. यामुळे भविष्यात सिलेंडर बुकिंग, सब्सिडीचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी टाळता येतील.
इतर बातम्या
Join Whatsapp Group