धक्कादायक !  जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या अंगावरच कोसळला स्लॅब; कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या अंगावरच कोसळला स्लॅब; कुठे घडली घटना ?
img
Nandini khandare More
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णालयांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलं आहे. काही दिवसापूर्वीच अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रायगडच्या अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील एका रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळलाय.

मिळालेल्या माहितीनुसार , सुनिल आवरे असं जखमी झालेल्या रुग्णाचे नाव आहे. सुनिल आवरे हे अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. त्याचवेळी रुग्णालयाच्या खोलीचा स्लॅब रुग्णाच्या अंगावर कोसळला. या दुर्घटनेत सुनील आवरे जखमी झाल्याची माहिती आहे.

दरम्यान रुग्णालयाची दुरावस्था आणि स्लॅब कोसळण्याची दुर्घटनेवरून शेतकरी कामगार पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्र लेखा पाटील त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी रुग्णालयाची दयनीय स्थिती पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group