नेपाळमध्ये महाप्रलय !  महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर
नेपाळमध्ये महाप्रलय ! महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर
img
Nandini khandare More

नेपाळमध्ये काल बुधवारी, अचानक आलेल्या महापूराने परिस्थिती गंभीर झाली आहे. अनेक शहरं उद्धवस्त झाली. गावचं गावं वाहून गेली. हॉटेल्स, शाळांना मोठा फटका बसला. पूल, रस्ते वाहून गेले. या नैसर्गित संकटात देशातील एकूण 133 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही जणांचा समावेश आहे. बेपत्ता भारतीयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अद्यापही त्यांच्याविषयीची माहिती समोर आलेली नाही. 

दरम्यान महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. मंत्रालयात 24 तास हा कक्ष सुरू आहे. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी आणि मदत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक ऑनलाईन लिंक जाहीर केली आहे. मंत्रालयातील राज्य नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असेल.

नेपाळमधील पर्यटन बोर्डाच्या आकडेवारीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत एकूण 403 नेपाळी आणि अनेक परदेशी नागरिकांशी कोणताही संपर्क झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये सर्वाधिक 133 भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. 

या टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क

महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाकडून एक विशेष टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1070 आणि नियंत्रण कक्ष 91-9321587143 क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांनी, त्यांचे मित्र, नातेवाईक जर नेपाळमध्ये अडकले असतील तर त्यांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या नातेवाईकांचे नाव, त्यांचा मोबाईल क्रमांक, नेपाळमध्ये ते सध्या कुठे अडकले आहेत. हॉटेल, ठिकाणाचे नाव, त्यांच्या यात्रेसंबंधीची माहिती आणि कुटुंबियांच्या संपर्काविषयीची माहिती उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नेपाळमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. कुटुंबीयांचा संपर्क होत नसल्यास विशेष लिंकवर तातडीने माहिती नोंदवण्याचे धाराशिव चे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आवाहन केले आहे.  नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक द्यावा. टोल फ्री 1077 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group