गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात घसरण होत होती. त्यामुळे सोने चांदी खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता मात्र आता पुन्हा एकदा हे भाव गगन भरारी घेऊ लागत असल्याने खरीददारांचे टेन्शन वाढले आहे
समोर आलेल्या माहितीनुसार , आज सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. सलग ३ दिवस दरात घसरण झाल्यानंतर आता सोनं-चांदीचे दर वाढले. सुवर्णनगरीत आज सोने १७०० रूपयांनी तर चांदी ३००० रूपयांनी महाग झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने होत असलेल्या बदलाचा परिणाम सोनं- चांदीच्या बाजारात सातत्याने होत आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोनं-चांदीचे भाव कमी झाले हेाते. हेच चित्र या आठवड्यात देखील कायम राहिले. आठवड्याच्या पहिल्या ३ दिवसांत सोनं– चांदीचे दर कमी झाले होते. दरम्यान बुधवारी दरात मोठी घसरण झाल्यानंतर सायंकाळी चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली होती. यानंतर आज सोनं आणि चांदीचे दर पुन्हा वधारले आहेत.
बुधवारी २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा विना जीएसटी भाव १ लाख ५१ हजार ८०० रुपयांवर राहिला होता. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या भावामध्ये १ हजार ७०० रूपयांची वाढ होऊन दर १ लाख ५३ हजार ५०० रूपयांवर आले आहेत. तर बुधवारी प्रति किलो चांदीचा विना जीएसटी भाव २ लाख ३५ हजार रुपये इतका होता. त्यात गुरूवारी १ किलो चांदीच्या दरामध्ये ३ हजारांची वाढ होऊन चांदीचा भाव २ लाख ३८ हजार प्रति किलो इतका झाला आहे.